दहा हजार ग्राहकांनी पाठविले फोटो मीटर रिडींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:02 PM2020-08-19T23:02:11+5:302020-08-20T00:22:52+5:30
नाशिक : ज्या वीजग्राहकांचे मीटररिडींग घेणे काही कारणांमुळे शक्य झाले नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून फोटो मीटर रिडींग स्वत: सबमीट करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक : ज्या वीजग्राहकांचे मीटररिडींग घेणे काही कारणांमुळे शक्य झाले नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून फोटो मीटर रिडींग स्वत: सबमीट करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी कृत नसेल असे ग्राहक सुद्धा महावितरण मोबाईलअँपद्वारे वीज मीटरचे रिडिंग व फोटो पाठवू शकणार आहे. नाशिक परिमंडळात या महिन्यात आतापर्यंत १० हजार८८६ ग्राहकांनी मीटर रीडिंग फोटो महावितरण अँपच्या माध्यमातून पाठविले असल्याची माहिती देण्यात आली.
ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे देयक देण्यात येते, हे देयक त्याच्या वीज मीटरवर असलेल्या रिंडींगच्या आधारावर देण्यात येत असते; मात्र कुठल्याही कारणास्तव रिडींग प्राप्त झाले नाही वा सदोष असेल तर देयक सुद्धा सरासरी वापरानुसार असू शकते. महावितरणच्या मोबाईल अँपव्दारे ग्राहक घरबसल्या आता आपले मीटर रिडींग पाठवू शकतात.