छायाचित्रण दिन : प्रेस फोटोग्राफी प्रदर्शनाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:08 PM2018-08-19T23:08:32+5:302018-08-19T23:10:30+5:30

रविवारी (दि.१९) संध्याकाळी झालेल्या या छायाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ‘लोकमत’चे छायाचित्रकार नीलेश तांबे, प्रशांत खरोटे, राजू ठाकरे, सोमनाथ कोकरे, चित्रकार बाळ नगरकर, पंकज चांडोले, हेमंत घोरपडे, केशव मते, भूषण पाटील, रघुनंदन मुजूमदार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, राजा पाटेकर आदी उपस्थित होते.

Photography Day: Focus attention to the press photography exhibition | छायाचित्रण दिन : प्रेस फोटोग्राफी प्रदर्शनाने वेधले लक्ष

छायाचित्रण दिन : प्रेस फोटोग्राफी प्रदर्शनाने वेधले लक्ष

Next
ठळक मुद्देछायाचित्रामागे बातमीमूल्य दडलेले असते. छायाचित्रे न्याहाळण्यासाठी गर्दी

नाशिक : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात मांडण्यात आलेली छायाचित्रे लक्षवेधी ठरली. या प्रदर्शनात शहरातील सर्व वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या एकापेक्षा एक सरस बातमीमूल्य असलेली बोलकी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.
रविवारी (दि.१९) संध्याकाळी झालेल्या या छायाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ‘लोकमत’चे छायाचित्रकार नीलेश तांबे, प्रशांत खरोटे, राजू ठाकरे, सोमनाथ कोकरे, चित्रकार बाळ नगरकर, पंकज चांडोले, हेमंत घोरपडे, केशव मते, भूषण पाटील, रघुनंदन मुजूमदार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, राजा पाटेकर आदी उपस्थित होते.

वृत्तपत्र छायाचित्रकार म्हटला की, नागरी समस्यांपासून दंगलीपर्यंत सण-उत्सवांपासून कुंभमेळ्यापर्यंत सर्वच घटना, घडामोड त्याच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेली असते. त्याने टिपलेल्या छायाचित्रामागे बातमीमूल्य दडलेले असते. त्यामुळे वृत्तपत्र छायाचित्रकाराच्या छायाचित्राला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त असते. त्याचे छायाचित्र हे समाजाला एक आगळावेगळा संदेश सातत्याने पोहचविण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करते. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनात मांडली गेलेली छायाचित्रे न्याहाळण्यासाठी गर्दी केली होती. हे प्रदर्शन मंगळवारपर्यंत संध्याकाळी सहा ते नऊ यावेळेत सर्वांसाठी खुले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. नाशिककरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनात मांडलेल्या छायाचित्रांचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Photography Day: Focus attention to the press photography exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.