शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे : काकतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 02:51 PM2020-01-28T14:51:51+5:302020-01-28T14:58:18+5:30
प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. यासाठी महिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीकला काकतकर यांनी केले.
नाशिक : ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकले जाण्याची क्रि या होय. यासह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. यासाठी महिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीकला काकतकर यांनी केले.
लाडशाखीय वाणी समाज आकांक्षा महिला मंडळातर्फेत्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सौंदर्य व त्वचारोगतज्ञ डॉ. सपना नेरे, नगरसेविका दिपाली कुलकर्णी, मंडळाच्या अध्यक्षा रेखा कोतकर, संस्थापक अध्यक्षा आशा सोनजे उपस्थित होत्या. डॉ. नेरे म्हणाल्या की, उन्हाळ्यात आपल्याला अधिक घाम येतो आणि योग्य ती स्वच्छता घेतली नाही तर आजार होण्याचा धोका अधिक असतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. यावेळी पल्लवी खुटाडे, निलम बधान, शैला बधान, वर्षा मुसळे, सुजाता कुडे, प्रभावती बाविस्कर , चारूलता अमृतकर, मनिषा खैरनार, सारिका सोनजे, जिगिषा महाजन आदी उपस्थित होते.