फिजिक्स, केमिस्ट्रीने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित सीईटी : बायोलॉजीचा पेपर सोपा गेल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:36 AM2018-05-11T01:36:07+5:302018-05-11T01:36:07+5:30

नाशिक : अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी (सामायिक परीक्षा) परीक्षेत विद्यार्थ्यांची फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाच्या पेपरने दमछाक केली.

Physics, chemistry disorders: Mathematics CET: Biology paper eased with ease | फिजिक्स, केमिस्ट्रीने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित सीईटी : बायोलॉजीचा पेपर सोपा गेल्याने दिलासा

फिजिक्स, केमिस्ट्रीने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित सीईटी : बायोलॉजीचा पेपर सोपा गेल्याने दिलासा

Next
ठळक मुद्देपरीक्षेस सुमारे ५३ हजार ४५० प्रविष्ट झाले काल रात्रीपासूनच जिल्हाभरातून विद्यार्थी दाखल झाले

नाशिक : अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी (सामायिक परीक्षा) परीक्षेत विद्यार्थ्यांची फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाच्या पेपरने दमछाक केली. गणित विषयाचा पेपर फारसा कठीण नसल्याचे तर बायोलॉजीचा पेपर सोपा असल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमास प्रवेशसाठी गुरु वारी शहरातील जवळपास ६० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस सुमारे ५३ हजार ४५० प्रविष्ट झाले होते. राज्यभरातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जात असल्याने विद्यार्थी सीईटीची परीक्षा देतात. या परीक्षेला काल रात्रीपासूनच जिल्हाभरातून विद्यार्थी दाखल झाले होते. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्राच्या समोरच रात्र काढली तर काहींनी आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेत आज परीक्षा दिली. व्यावसायिक अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य असते. सीईटी परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून सुमारे ४ लाख ३५ हजारांहून अधिक परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले आहेत.
गणित, जीवशास्त्राची स्वतंत्र परीक्षा
गुरुवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत गणित व दुपारी १२.३० ते २ या वेळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची परीक्षा घेण्यात आली. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत जीवशास्त्राची परीक्षा झाली. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी ५० गुण असलेली सामायिक प्रश्नपत्रिका व गणितासाठी १०० गुण आणि जीवशास्त्रासाठी १०० गुणांच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली.

Web Title: Physics, chemistry disorders: Mathematics CET: Biology paper eased with ease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा