दोन हवालदारांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:29 PM2018-11-14T17:29:50+5:302018-11-14T17:32:44+5:30

सटाणा : शहरातील डॉ. किरण अहरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्याने सटाणा पोलीस ठाण्याच्या दोन हवालदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही जण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

Pick of two constables bribe | दोन हवालदारांची उचलबांगडी

दोन हवालदारांची उचलबांगडी

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा : डॉक्टर पत्नी मृत्यू प्रकरणी तपासात कसूर

सटाणा : शहरातील डॉ. किरण अहरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्याने सटाणा पोलीस ठाण्याच्या दोन हवालदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही जण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या आदेशाने सटाण्यातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नी सुषमा अहिरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गेल्या आठवड्यात मालेगावचे अपर अधीक्षक निलोत्पल यांनी नव्याने तपास सुरु केला आहे. त्यांनी घटनास्थळाची दोन तास पाहणी केली होती. त्यानंतर डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान हवालदार शिंदे व नवनाथ पवार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ मालेगाव पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात अजून काही कर्मचारी व अधिकारी वरिष्ठ अधिकाºयांच्या रडारवर असून त्यांचीही गच्छन्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार असल्याची ही चर्चा तालुक्यात सुरुआहे.

दोन हवालदारांची उचलबांगडी
सटाणा : डॉक्टर पत्नी मृत्यू प्रकरणी तपासात कसूर

Web Title: Pick of two constables bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.