गंजमाळ परिसरात दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:29 AM2018-11-12T01:29:46+5:302018-11-12T01:30:04+5:30

शिवाजीरोडवरील संदर्भ रुग्णालयाजवळ ‘नेपाळी कॉर्नर’ येथे तीन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ल्याची घटना व्यावसायिक कारणावरून घडली होती. या हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू असून सुनावणी तोंडावर आली असताना संबंधितांनी वाद उकरून हाणामारी केल्याची घटना घडली. या घटनेत तीन युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Picketing in Ganjamal area | गंजमाळ परिसरात दगडफेक

गंजमाळ परिसरात दगडफेक

Next
ठळक मुद्देपरस्परविरोधी गुन्हे : जुन्या वादातून दोन गट समोरासमोर

नाशिक : शिवाजीरोडवरील संदर्भ रुग्णालयाजवळ ‘नेपाळी कॉर्नर’ येथे तीन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ल्याची घटना व्यावसायिक कारणावरून घडली होती. या हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू असून सुनावणी तोंडावर आली असताना संबंधितांनी वाद उकरून हाणामारी केल्याची घटना घडली. या घटनेत तीन युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीरोडवर तीन वर्षांपूर्वी व्यावसायिक कारणावरून खैरनार व कुरेशी या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले होते. या वादाची कुरापत काढून दोघा कुटुंबातील लोकांनी चर्चेच्या बहाण्याने एकत्र येत एकमेकांवर हल्ला केला. यामुळे शनिवारी (दि.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खडकाळी सिग्नलच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकमेकांच्या घराच्या दिशेने झालेली दगडफेक व लाठ्या, काठ्या, तलवारींचा करण्यात आलेल्या वापरामुळे परिसरात दहशत पसरली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी पोलीस बळासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी त्वरित जमाव पांगविला. या घटनेत पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हाणामारीमध्ये राकेश ऊर्फ अर्जुन खैरनार, मोबीन शाकीर कुरेशी, शकील शाकीर कुरेशी हे जखमी झाले आहेत.
भद्रकाली पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. परस्परविरोधी जिवे मारण्याचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीरोडवर ‘स्ट्रायकिंग’ तैनात
शिवाजीरोडवर रविवारी (दि.११) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी भद्रकाली पोलिसांनी सकाळपासूनच या भागाचा ताबा घेतला होता. सकाळी कोणत्याही व्यावसायिकाला येथे दुकान थाटण्यास पोलिसांनी मज्जाव केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासनाकडून सोमवारी चर्चा केली जाणार असून त्यानंतर शिवाजीरोडवरील व्यवसायाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Picketing in Ganjamal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.