भाजपातर्फेशहरात संविधान गौरव दिनानिमित्त चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:20 AM2018-11-27T00:20:50+5:302018-11-27T00:21:08+5:30
भारतीय जनता पार्टीतर्फे पंचवटी, नाशिकरोड, द्वारका, मध्य-पश्चिम, सिडको, सातपूर या सहाही मंडलात एकूण १५० ठिकाणी संविधान गौरव दिन कार्यक्र म उत्साहात पार पडले. मुख्य कार्यक्र म महानगर मुख्यालय वसंतस्मृती येथे झाला. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खास तयार करण्यात आलेला चित्ररथ संपूर्ण महानगरात फिरविण्यात आला.
नाशिक : भारतीय जनता पार्टीतर्फे पंचवटी, नाशिकरोड, द्वारका, मध्य-पश्चिम, सिडको, सातपूर या सहाही मंडलात एकूण १५० ठिकाणी संविधान गौरव दिन कार्यक्र म उत्साहात पार पडले. मुख्य कार्यक्र म महानगर मुख्यालय वसंतस्मृती येथे झाला. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खास तयार करण्यात आलेला चित्ररथ संपूर्ण महानगरात फिरविण्यात आला. सर्व ठिकाणी चित्ररथाचे स्वागत करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यालयात झालेल्या कार्यक्र मात स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे महानगराध्यक्ष संजय गालफाडे, मध्य-पश्चिम मंडलचे अध्यक्ष देवदत्त जोशी, कुणाल वाघ, शशांक हिरे, सुजाता करजगिकर, सोनल दगडे आदींनी आपल्या भाषणात संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना संविधान तयार करण्यास बहुमोल योगदान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख करून त्यांना अभिवादन केले. प्रारंभी शशांक हिरे यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले तर कुणाल वाघ यांनी वाचन केले. नंतर संविधानाचे महत्त्व विशद करणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. प्रास्ताविक संजय गालफडे यांनी केले.
कार्यक्र मास नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, सुप्रिया खोडे, महिला मोर्चा महानगराध्यक्षा रोहिणी नायडू, द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुरेश मानकर, विजय चव्हाण, राजू मोरे, वसंत उशीर, विकी ठाकूर, संपत जाधव, अरुण शेंदूर्णीकर, बापू लोखंडे, धनेश जाधव, विजय पगार, भास्कर घोडेकर, दीपक पाटील, शैलेश भावसार, सचिन झाल्टे, संदीप जोशी, पांडुरंग सावजी, राजेंद्र चिखले, विजय कुलकर्णी, निखिल जाधव, शैलेश आजगे, राम बडोदे, देवेंद्र चुंभळे, नितीन कार्ले, यश जंगम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, २६/११ च्या मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना यावेळी आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे तसेच विविध आघाड्या आणि सेलतर्फे बुद्धविहार, वाचनालय, संपर्क कार्यालये येथे झालेल्या संविधान दिन गौरव कार्यक्र मात संविधानाचे जाहीर वाचन करण्यात आले.