मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

By admin | Published: September 7, 2014 12:22 AM2014-09-07T00:22:12+5:302014-09-07T00:22:12+5:30

मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

The picture of MNS-Sena was an indirect mood of BJP | मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

Next

 

नाशिक : सेना-मनसेपेक्षाही अल्प संख्याबळ बाळगून असलेल्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदावर दावा ठोकून दोन्ही (मित्र) पक्षांना अडचणीत आणण्याची खेळी खेळली असली व महापौरपदाबाबत भाजपाने कोणतीही भूमिका घेतली तरी, त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणे अटळ असल्याचे मानले जात आहे. एकीकडे सत्तेच्या सौद्यात अगणित महत्त्व प्राप्त झाल्याच्या आनंदात भाजपा रममाण होत असताना दुसरीकडे महापौरपदावर दावा सांगणाऱ्या मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र दिसू लागले आहे.
महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत (अलीकडचा अपवाद वगळता) नेहमीच फरफट पदरी पडणाऱ्या भाजपाने मनसेशी युती करून स्वत:भोवती काही काळापुरते महत्त्व निर्माण केले असले तरी, ते कायमच टिकेल याविषयी पक्षाच्याच नेत्यांना शाश्वती नाही. विशेष करून होऊ घातलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट महापौरपदावर दावा ठोकून मनसे व सेनेला पायधूळ झाडायला लावल्यामुळे भाजपाची मंडळी खुशीत असून, त्यातच नाशिक दौऱ्यावर येऊन गेलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही महापौरपदाबाबतची संदिग्धता कायम ठेवल्याने त्यात भर पडली आहे. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मनसेची सुरू असलेली घालमेल व सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापौरपद खेचून आणण्यासाठी आसुसलेली सेना याचा नेमका लाभ उचलण्याचा भाजपाने प्रयत्न चालविला आहे. विशेष करून विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सेनेचे नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. महापौरपदाच्या मोबदल्यात नाशिक शहरातील विधानसभा मतदारसंघाच्या जागांची अदलाबदल टाळण्यात सेनेला भाग पाडणे किंबहुना एखाददुसरी जागा अधिकची पदरात पाडून घेता येणे शक्य आहे, काय याची चाचपणी भाजपाकडून केली जात आहे.
प्रत्यक्षात भाजपाच्या या प्रयत्नांतून त्यांचीच कोंडी करण्याची खेळी सेना आखत आहे. महापौरपद निवडणुकीसाठी भाजपाने मनसेला साथ दिली, तर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेनेकडून साहजिकच नाशिक महापालिकेतील मनसेच्या कारभारावर व शहरातील तीन आमदारांच्या कार्यकाळावरच भर दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत त्याच मनसेच्या गैरकारभारात भाजपाही सहभागी झाल्याचा संदेश मतदारांपुढे जाणार असल्याने त्याचा फटका भाजपा उमेदवार उभ्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कसा बसेल, याची व्यूहरचना सेनेने सुरू केली आहे. महापालिकेत मनसेसोबत व विधानसभेत सेनेबरोबर अशी दुहेरी भूमिका भाजपाला घेता येणार नाही. महापालिकेपेक्षाही भाजपाला राज्याची सत्ता अधिक महत्त्वाची आहे हे विशेष. (प्रतिनिधी)

Web Title: The picture of MNS-Sena was an indirect mood of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.