स्वार्थीपणामुळे संस्कृतीचे चित्र बिघडले : अनिल अवचट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:50 AM2019-04-18T00:50:40+5:302019-04-18T00:50:59+5:30
स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.
नाशिक : स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.
भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि.१७) तीनदिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘बदलती संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामकोचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांच्यासह व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बुरड, राजू धाडीवाल, यतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल अवचट म्हणाले, जात, धर्म, संस्कृतीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. पूर्वी जमिनीला आईसमान मानले जात, परंतु आता जमिनीला किती पैशाचे मोल आहे याचाच विचार केला जातो. मात्र, माणूस दिवसेंदिवस एकाकी जीवनाक डे वळतो आहे. सर्वांनी या स्थितीतून बाहेर पडून ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या पंक्तीप्रमाणे समाजातील अनाथ, वेश्या, दुर्बल यांसारख्या वंचित घटकांसाठी सेवाभावनेने काम करण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
निसर्ग संवर्धनाचे आवाहन
वाढत्या शहरीकरणातून निर्माण झालेल्या एकाकीपणाचे दुष्परिणाम सांगतानाच पूर्वीची विकेंद्रित जीवनशैली पर्यावरण संवर्धन करणारी असल्याचे डॉ. अनिल अवचट यांनी अधोरेखित केले. परंतु, वसाहतवादी ब्रिटिशांनी पर्यावरणाचा ºहास सुरू केला असून, तो आजही सुरू आहे. देशाची संपत्ती लुटण्यासाठी बनविलेली केंद्रे इंग्रजांनंतरही आपल्या सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवल्याने त्याचे शहरात रूपांतर होऊन कचरा, सांडपाणी व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगताना सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. अवचट यांनी केले.