अंबानेर शिवारात लावला पिंजरा
By admin | Published: February 2, 2016 10:47 PM2016-02-02T22:47:46+5:302016-02-02T22:52:12+5:30
अंबानेर शिवारात लावला पिंजरा
पांडाणे : अंबानेर शिवारात बिबट्या जेरबंद करण्यासाठी अखेर वनविभागाने मंगळवारी सायं. ६ वाजता पिंजरा लावला. ‘अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दिंडोरीचे वनक्षेत्रपाल सुनील वाडेकर यांनी वणी वन परिमंडलचे अधिकारी एस. एल. पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबानेर येथे पिंजरा लावला.
रविवारी रामदास महाले यांच्या गायीला भक्ष्य करण्याच्या हेतूने आलेल्या बिबट्याने ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मांदाणेच्या दिशेला धूम ठोकली. तद्नंतर वनरक्षक पी. एस. चौरे यांनी अहिवंतवाडी, मांदाणे, अंबानेर, जिरवाडे, चामदरी, गोलदरी आदि परिसराची पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याची खात्री झाल्यानंतर पिंजरा लावण्यात आला. पिंजरा लावण्यासाठी ए. बी. मोरे, रमेश झुर्डे, रामदास महाले, संदीप गांगुर्डे, नामदेव गवळी व मांदाणे ग्रामस्थांनी मदत केली. (वार्ताहर)