शरयूनगर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग ; घनकचरा विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:33 PM2020-06-20T19:33:54+5:302020-06-20T19:36:47+5:30

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

Piles of rubbish on Sharyunagar Road; Neglect of solid waste department | शरयूनगर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग ; घनकचरा विभागाचे दुर्लक्ष 

शरयूनगर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग ; घनकचरा विभागाचे दुर्लक्ष 

Next
ठळक मुद्देनाशिक शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग शहयुनगर रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार कचऱ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

नाशिक : शहरात लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. ‘स्मार्ट’ शहराकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची घडी व्यवस्थित बसलेली असतानाही काही मंडळी विशिष्ट ठिकाणी कचरा फेकण्यातच धन्यता मानते. अशा मंडळींकडून घरातील तसेच छोटे-मोठे समारंभ यामधून जमा होणारा कचरा कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढिग साचले आहेत.
 इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग निर्माण झाले असून, महापालिके च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. नाशिकमधील वाढत्या शहरीकरणासोबतच नागरी वस्तीही वाढत असलेल्या इंदिरानगर परिसरातील जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर परिसरातील काही नागरिकांकडून कचरा फेकून अस्वच्छता पसरविली जात आहे. तसेच भाजी विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांसोबतच हातगाड्यांवाल्यांकडून या भाागात नियमित घंटागाडी येत असतानाही असा प्रकार सुरू असून, महापालिके च्या घनकचरा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात शिळे अन्न आणि इतर ओल्या कचºयाचा समावेश असल्याने या भागात मोकाट श्वानांचा उपद्रवही वाढला आहे, त्यामुळे या रस्त्याने सकाळी व सायंकाळी धावण्यासाठी आणि चालण्यासाठी बाहेर पडणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या भागात सातत्याने अन्नपदार्थ मिळत असल्याने येथे जमा होणाऱ्या मोकाट श्वानांनी परिसरातील निवासी वसाहतींमध्येच निवारा शोधल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने रस्त्यावर कचरा फेकणाºयांविरोधात तसेच कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. मात्र या भागात अनेक जण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा फेकत असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा फेकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. 

Web Title: Piles of rubbish on Sharyunagar Road; Neglect of solid waste department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.