तीर्थक्षेत्र मांगीतुंगी : सी़ आऱ पाटील यांनी घेतली विरक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:43 AM2018-05-01T01:43:13+5:302018-05-01T01:43:13+5:30
तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांनी पाटील यांची संस्थानचे मुख्य अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली आहे.
ताहाराबाद : तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांनी पाटील यांची संस्थानचे मुख्य अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली आहे. पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील. पुणे येथे व्यवसाय करून त्यांनी जगातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे जैन समाजाचे मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणी श्री ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणे साकारण्यात आलेल्या १०८ फूट उंच दिगंबर जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेवाच्या मूर्ती निर्माण कार्यासाठी स्वत: ६६ लाख वर्गणी दिली तसेच २३ वर्षांपासून माजी महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल यांच्या सोबत काम करून मूर्ती निर्माण कार्यात भरीव योगदान दिले आहे. दीक्षा घेण्यापूर्वी इंजि. पाटील यांनी मांगीतुंगीसह परिसराचा विकास व्हावा यासाठी शासकीय आश्रमशाळा, भिलवाड गाव वनसंरक्षण समिती, दसवेल येथील मारु ती मंदिर बांधकाम यासह अनेक ठिकाणी आर्थिक देणगी देऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अधिष्ठाता पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी आर्यिका चंदनामती माताजी, त्यागी माताजी, त्यागी संत, महामंत्री संजय पापडीवाल, डॉ. जीवन प्रकाश, विजयकुमार जैन यांच्यासह ट्रस्ट कमिटी सदस्य व भाविक उपस्थित होते.