तीर्थक्षेत्री भाविक ,पर्यटकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:39 AM2018-12-18T00:39:22+5:302018-12-18T00:39:36+5:30

पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे.

 Pilgrimage pilgrims, tourists visit | तीर्थक्षेत्री भाविक ,पर्यटकांची मांदियाळी

तीर्थक्षेत्री भाविक ,पर्यटकांची मांदियाळी

Next

नाशिक : पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. त्र्यंबकनगरीसह तपोवन, गंगापूर धरण परिसर पर्यटकांनी फुलला आहे.
नाशिक म्हटलं तर डोळ्यापुढे कुंभमेळ्याचा उत्साह तरळतो तर येथील द्राक्षांची चव जिभेवर रेंगाळते. गोदातीरी दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जसा जगप्रसिद्ध आहे तसेच द्राक्षसुद्धा. द्राक्षांपासून तयार होणाºया वाइनला तर भौगोलिक मानांकनही (जीआय टॅग) प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत नाशिकच्या वाइनची चव लोकप्रिय ठरली आहे. धार्मिक पुण्यनगरीचे पौराणिक, एतिहासिक महत्त्व लाभलेल्या नाशिकमध्ये भाविक पर्यटकांसह निसर्ग पर्यटकांचाही राबता वाढला आहे. तसेच येथील वायनरीजमध्येही विदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्याचे निरीक्षण राज्य पर्यटन महामंडळाकडून नोंदविण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनासाठी परराज्यातील भाविक पर्यटकांकडून नाशिकला आवर्जून पसंती दिली जाते. या वीकेण्डला त्र्यंबकेश्वरसह गोदाघाट, रामकुंड, तपोवन, पंचवटी, कावनई हे तीर्थक्षेत्र पर्यटकांनी गजबजून गेले होते.
नाशिकला लाभलेले गोदावरीचे खोरे, सह्याद्रीची पर्वतरांग, गड-किल्ले, धरणे, घाटमार्ग, आदिवासी भागाचा बाज, वायनरी आणि धार्मिक-पौराणिक क्षेत्रामुळे पर्यटकांची नेहमीच नाशिकला पसंती असते. नाशिकपासून त्र्यंबकेश्वर, शिर्डी, इगतपुरी विपश्यना केंद्र जवळच असल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. पुढील वीकेण्ड आणि ख्रिसमसची सुटी लागून असल्यामुळे पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. नाशिकमधील धार्मिक, नैसर्गिक पर्यटनासोबत गिरीभ्रमंती आणि धरण पर्यटनदेखील जमेची बाजू आहे.
- नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळ

Web Title:  Pilgrimage pilgrims, tourists visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.