भाविकांचा ओघ त्र्यंबकला सुरूच
By admin | Published: September 26, 2015 10:42 PM2015-09-26T22:42:01+5:302015-09-26T22:42:41+5:30
भाविकांचा ओघ त्र्यंबकला सुरूच
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीला अलोट गर्दी झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा ओघ सुरूच होता. कुशावर्तात स्नान करण्यासाठी, तसेच त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांची त्र्यंबकला आजही गर्दी झाली होती.
कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी पार पडली. या पर्वणीला भाविकांची विक्रमी गर्दी झाल्याने त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही पर्वणीला कुशावर्तात स्नान करता आले नाही. त्र्यंबकेश्वरपर्यंत बसेस असल्याचा दावा प्रशासनाने केला होता मात्र गर्दीचा अंदाज चुकल्याने अनेक तास बसेस बंद ठेवण्यात आल्या. परिणामी भाविकांना पंधरा ते वीस किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाणे रद्द करून त्याऐवजी शनिवारी पवित्र स्नानाची पर्वणी साधली. (प्रतिनिधी)