पालिकेत स्वच्छतेसाठी अधिकारी धारेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:17 AM2018-11-28T01:17:20+5:302018-11-28T01:17:37+5:30
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली.
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली. शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचरा आढळत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी उपआयुक्त महेश बच्छाव, हरिभाऊ फडोळ, डॉ. सचिन हिरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता दिसत नसल्याने महापौर भानसी यांनी नाराजी व्यक्त केली. झाडांचा पालापाचोळा तसेच फांद्या संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करावी.