पिंपळगावलाबसवंतला मोबाईल दुरूस्तीवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 04:20 PM2019-01-11T16:20:42+5:302019-01-11T16:22:01+5:30
पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली.
पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली.
विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता अरविंद शालीग्राम, संशोधक शरद पुस्तके, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, प्राचार्य डा. एस. एस. घुमरे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले.
डा. अरविंद शालीग्राम म्हणाले की, मोबाईल दुरु स्ती हे विद्यार्थ्यांसाठी नवे क्षेत्र असून यातून ते रोजगार निर्मिती करु शकतात. यासाठी त्यांची कुशलता व रु ची किती आहे हे ओळखण्याकरीता अशा कार्यशाळांची गरज आहे. शरद पुस्तके यांनी मोबाईल दुरु स्तीसाठी लागणा-या विविध घटकांची माहिती दिली. प्राचार्य एस. एस. घुमरे यांनी विविध महाविद्यालयातून कार्यशाळेत सहभागी झालेल्या शंभर विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. इलेक्टॅÑानिक विभागप्रमुख प्रा. डी. के. आहेर यांनी प्रास्तविक केले. प्रा. एस. ए .वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धांडे यांनी मोबाईलशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण प्रात्यिक्षक स्वरु पात करु न विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. व्ही. एस. काळे यांनी मोबाईलच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. प्रा. डी. एन. कडलग, प्रा. पी. बी. निकम, भौतिक शास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. व्ही. घोरपडे, डा. एस. एन. आहिरे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. व्ही. निकम यांनी कार्यशाळे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
--