पिंपळगाव बसवंतला वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:13 AM2019-01-28T00:13:25+5:302019-01-28T00:13:45+5:30
शहरात नागरीकांकडून बेशिस्तपणे वाहन पार्कींग केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. रविवारी (दि २७) सायंकाळी सहा वाजे पासून वाहतुक कोंडी झाल्याने पिंपळगाव शहर पूर्ण पणे लॉक झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
पिंपळगाव बसवंत : शहरात नागरीकांकडून बेशिस्तपणे वाहन पार्कींग केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. रविवारी (दि २७) सायंकाळी सहा वाजे पासून वाहतुक कोंडी झाल्याने पिंपळगाव शहर पूर्ण पणे लॉक झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. वाहनांच्या अडथळ्यामुळे खरेदी साठी बाहेर पडलेल्या नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. वणी चौफुली, चिंचखेड चौफुली, उंबरखेड चौफुली, निफाड फाटा, वीटभट्टी, मेनरोड या सर्वच रस्त्यांवर वाहनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मदत करणाऱ्यालाच मारहाण
पिंपळगाव बसवंत शहरात पूर्ण वाहतुक कोंडी असतांना माणुसकी म्हणून वाहतुक सुरळीत व्हावी म्हणून मद्दत करणाºयालाच वाहन चालकांकडून मारहाण झाली. या संदर्भात पोलिसांनी गांभीर्याने घेऊन समाज कंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. असे मत नागरीकांनी व्यक्त केले.