पिंपळगावत पुन्हा चौघांचे अहवाल पॉझििटव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:25 PM2020-06-27T22:25:43+5:302020-06-27T22:26:08+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा शहरातील मुस्लिम गल्ली दोन पुरु ष तर तुळजाभवानी कॉलनी मागील परिसरातील ४एका व्यक्तीसह बनकर गल्लीत एक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील रु ग्णसंख्या ३१ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे.

याबत अधिक माहिती अशी की, आहेरगावात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सहा रु ग्णांच्या संपर्कात आल्याने शहरातील तुळजाभवानी कॉलनी मागील बाजूस राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. तर शहरातील बनकर गल्ली परिसरातील ५५ वर्षीय महिला आजारी असल्याने घशाचे नमुने तपासनीस पाठवले होते, त्यानुसार शनिवारी (दि.२७)आलेल्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले परंतु काही तासातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यातच मुस्लिम गल्लीतही संपर्कात आलेल्या ७४ व २७ वर्षीय पुरु षांचा अहवाल बाधीत आला आहे. सदर कुटुंबातील सदस्यांना क्वॉरंटाईन करणार असल्याची माहिती पिंपळगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.