पिंपळगाव बसवंत शहर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:07 AM2019-08-05T00:07:54+5:302019-08-05T00:08:24+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. पाराशरी नदीला पूर आला असून, अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चिंचखेड चौफुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३च्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत.
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. पाराशरी नदीला पूर आला असून, अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चिंचखेड चौफुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३च्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. संततधार पावसामुळे या खड्ड्यांचा आकार वाढून त्यात पाणी साचले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे रहदारी ठप्प झाली आहे. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी गेली होती. त्यावेळी सर्व्हिस रोडचे काम करणे गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे खड्डे पडून हे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पराशरी नदीला पूर...
पिंपळगाव बसवंतच्या पराशरी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने आहेरगावचा पिंपळगावशी संपर्कतुटला आहे. आठवडे बाजाराचा व्यावसायिकांना फटका बसला. पिंपळगाव बसवंतचा रविवारी आठवडे बाजार असल्याने शुक्रवारी व शनिवारी अहोरात्र पडणाºया पावसामुळे रविवारी आठवडे बाजार असूनदेखील दुकाने बंद अवस्थेत होती. त्यामुळे व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागला.
सर्व्हिसरोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक गाड्यांचे नुकसान होऊन वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने वेळोवेळी प्रशासन अधिकारी, कर्मचाºयांना तोंडी व लेखी निवेदन देऊनसुद्धा आजपर्यंत दुरुस्तीचे काम झाले नाही.
याचाच परिणाम म्हणून या खड्ड्यांत पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून तसेच इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने नादुरुस्त होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनाडी नाल्याला पूर ...... सतत पडणाºया पावसामुळे शहरातील मनाडी नाल्याला पुराचे स्वरूप आल्याने मनाडी नाल्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानदाराचे नुकसान झाले आहे.
आठवडे भाजीपाला बाजारपेठ शुकशुकाट .जिल्हाभरात पावसाने थैमान घातले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आठवडे बाजारपेठला पावसामुळे जणू मंदीचा वेढा पडला असून,बाजारपेठत शुकशुकाट होता.