पिंपळगाव बसवंत ग्रेप टाउनचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:57 PM2019-12-27T23:57:42+5:302019-12-27T23:58:18+5:30
: पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली.
कसबे-सुकेणे : पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली.
पिंपळगाव बसवंत ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरच्या वार्षिक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बोरस्ते व जेसी संजय काठे हे उपस्थित होते. प्रारंभी पिंपळगाव ग्रेप टाउनचे अध्यक्ष डॉ. सुधीर भांबर यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर केला. संस्थापक अध्यक्ष जेसी सिनेटर सुधाकर कापडी यांनीे यास अनुमोदन दिले. डॉ. सुधीर भांबर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जेसी श्रीनिवास गायकवाड यांना शपथ देऊन २०२० सालचा पदभार सोपविला. तर महिला अध्यक्ष जेसी प्रियंका आथरे यांनी जेसी अलका बनकर यांना तर सेक्र ेटरी डॉ. संदीप वाघ यांनी जेसी तन्वीर शेख यांना, खजिनदार विलास विधाते यांनी नवनिर्वाचित खजिनदार जेसी पांडुरंग दवंगे व सहखजिनदार गोरख कागदे यांना पदभार देत शिल्लक सुपूर्द केली. यावेळी आमोद मेहता, माजी झोन अध्यक्ष मयूर करवा, प्रमोद वाघ, डॉ. पंकज जैन, अंकुश सोमाणी, सौरभ जैन, नागेश पिंगळे, सुनील परदेशी, जोपूळचे सरपंच माधवराव उगले, प्रा. मोरेश्वर पाटील, लीला सोनवणे, संजय भांबर, स्वरगंधचे राजेश अक्कर, मनीषा शिंदे, संजय मोते, नाशिक जेसीजचे अध्यक्ष जयंत दराडे, ऋषिकेश धाकराव, लोकेश कटारिया, प्रशांत पारख आदी उपस्थित
होते. यानिमित्त डॉ. अरुण गचाले यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. सुधीर भांबर व योगीता भांबर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आई-वडिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश बनकर, अल्पेश पारख, दीपक विधाते, डॉ. संजय शिंदे, अजित कुशारे, प्रशांत मोरे, संतोष शिरसाठ, राहुल जगताप, तृप्ती मोरे, योगीता कापडी, योगीता गायकवाड, आदी उपस्थित होते.
रोपे वाटप
ज्युनियर जेसी अध्यक्ष शिवानी कापडी यांनी पर्वणी भांबर यांच्याकडे २०२० चा पदभार सोपविला. या पदग्रहण सोहळ्यात निर्मल मुनोत यांनी नवीन जेसी सदस्यांना शपथ दिली. उपाध्यक्ष जेसी चेतन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सर्व उपस्थितांना नवजीवन फाउण्डेशनतर्फेपुस्तके व जेसीआयतर्फे झाडांची रोपे भेट देण्यात आली.