पिंपळगाव बसवंतला जिल्ह्यातील पहिला ‘द स्पॅरो वॉल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:18+5:302021-03-21T04:14:18+5:30
पिंपळगाव बसवंत : प्राणी पक्ष्यांना खाऊ- पिऊ घालणे आपल्या संस्कृतीतच आहे . ही संस्कृती जपतच "पिंपळगाव ग्रामपंचायतच्या ‘माझी ...
पिंपळगाव बसवंत : प्राणी पक्ष्यांना खाऊ- पिऊ घालणे आपल्या संस्कृतीतच आहे . ही संस्कृती जपतच "पिंपळगाव ग्रामपंचायतच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत ‘अमी जीवदया" संस्थेच्या सहकार्यातून 'चिमणी वाचवा-जग वाचवा' असा संदेश देत "द स्पॅरो वॉल" ( चिमण्यांची भिंत ) या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ ओझन पार्क येथे संपन्न झाला .जागतिक चिमणी दिनानिमित्त केलेली ही संकल्पना निश्चितच पिंपळगाव बसवंत शहराला नवी ओळख निर्माण करून देणार आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे. उन्हाळा आला की, चिमण्यांसाठी दाणे पाणी व निवारा आवश्यक असतो. त्यामुळे लहानश्या चिऊताईच्या सहवासासाठी त्यांच्याच दुनियेत त्यांना छोटंसं घरट बनवूया आणि शांत होत चाललेल्या या चिवचिवाटास पुन्हा ऐकू या आणि गोष्टीपुरत्याच मर्यादित राहिलेल्या चिमण्यांना जगवू याच उद्देशाने हा अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून हजारो चिमण्यांचे पालन पोषण होणार आहे. याप्रसंगी उपसरपंच सुहास मोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, आल्पेस पारख, बाळा बनकर, अमी जीवदयाचे संचालक हरेश शहा, लक्ष्मण खोडे, दीपक विधाते, अनिल माळी, संदीप बैरागी आदी उपस्थित होते.
----------------
लहानश्या चिऊताईच्या सहवासासाठी त्यांच्याच दुनियेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या द स्पॅरो वाल साठी शेकडो चिमण्यांची घरटी, धान्याचे व पाण्याचे फिडर मोफत भेट देणार आहे.
- हरेश शहा, अमी जीवदया. संचालक
------------------
आतापर्यंत अमी जीवदया या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून एक लाख घरटी, धान्याचे व पाण्याचे फिडर मोफत मंदिर,शाळा ,सार्वजनिक ठिकाणे शासकीय कार्यालये,दवाखाने आदी ठिकाणी मोफत लावण्यात आले तर कोरोनाच्या महामारीत तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांना मोफत भेट देण्यात आले.
---------------------
पिंपळगावी ‘चिमण्यांची भिंत’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करतांना गणेश बनकर, हरेश शहा, संजय मोरे, आल्पेस पारख, बाळा बनकर, लक्ष्मण खोडे, दीपक विधाते, अनिल माळी, संदीप बैरागी आदी. (२० पिंपळगाव १)
===Photopath===
200321\20nsk_17_20032021_13.jpg
===Caption===
२० पिंपळगाव १