मराठा आरक्षणासाठी पिंपळगावला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:37 AM2018-07-27T00:37:37+5:302018-07-27T00:38:14+5:30
ठळक मुद्देपोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव (बसवंत): सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत शहरात समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळी साडे दहा वाजता मराठा समाजाच्यावतीने मुंबई -आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली परिसरात रास्ता रोको केला. सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना निवेदन देण्यात आले.