पिंपळगावी कोरोना योद्धांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 23:34 IST2021-08-02T23:27:21+5:302021-08-02T23:34:27+5:30
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात ठिकठिकाणी अभिवादन करत ह्यकोरोना योद्ध्यांह्णचा सत्कार करण्यात आला. निफाड फाटा येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मरीमाता मंदिराजवळदेखील समाज बांधवांच्या वतीने अभिवाद करण्यात आले.

पिंपळगावी कोरोना योद्धांचा सत्कार
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात ठिकठिकाणी अभिवादन करत ह्यकोरोना योद्ध्यांह्णचा सत्कार करण्यात आला. निफाड फाटा येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मरीमाता मंदिराजवळदेखील समाज बांधवांच्या वतीने अभिवाद करण्यात आले.
कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये पिंपळगाव बसवंत येथील काही कोरोना योद्ध्यांचे मोलाचे योगदान नागरिकांना मिळाले. त्यांनी जीवाची तमा न बाळगता अहोरात्र रुग्णांची निःस्वार्थपणे सेवा केली. त्यांचा बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य तथा पिंपळगाव शहराच्या वतीने जयंतीच्या निमित्ताने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ पाटील, सतीश मोरे, नीलेश पाटील, बाळासाहेब बंदरे, नाना जाधव, समाधान आहिरे, मंगेश शिरसाठ, श्यामभाऊ निरभवणे, बाळासाहेब ढोकळे, शरद जाधव, गणेश खरात, विजय कांबळे, संतोष साळवे, भारत भालेराव, अर्जुन भालेराव, सुनील साळवे, केदू जाधव, दीपक जाधव, तुळशिदास बंदरे, वाल्मिक भालेराव, अजय जाधव, विशाल खरात, भाऊसाहेब सोळशे, सदाशिव सोळशे, पंडित जाधव, विजय कांबळे, केदू शिरसाठ, राजू साबळे, संदीप जाधव, घनश्याम जाधव, हृतिक सोळशे आदी उपस्थित होते.