पिंपळगाव आगाराची लालपरीची सेवा सुरळीत सुरू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 08:44 PM2020-10-29T20:44:32+5:302020-10-30T01:29:42+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची प्रवाशी वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा खऱ्या अर्थाने लाभला आहे.

Pimpalgaon depot's Lalpari service starts smoothly .... | पिंपळगाव आगाराची लालपरीची सेवा सुरळीत सुरू....

पिंपळगाव आगाराची लालपरीची सेवा सुरळीत सुरू....

Next
ठळक मुद्देबस सॅनिटाइझर करून प्रवाशांमध्ये फिजिकल अंतर ठेवले जाते..

पिंपळगाव बसवंत : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची प्रवाशी वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा खऱ्या अर्थाने लाभला आहे.
कोरोनाचा सर्वत्र हाहाकार माजल्याने याचा सर्वाधिक फटका एसटी आगाराला बसला. गेल्या आठ महिन्यात आगाराला कोट्यावधीचे नुकसान सहन करावे लागले. शासनाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बस प्रवाशी वाहतूक दि. २० ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली होती.

त्यात पिंपळगाव बसवंत आगारच्या वतीने प्रवाशी वाहतूक सुरू करत आगारातूनच बसेस निर्जंतुकीकरण करत व गर्दी टाळण्याच्या दृष्टीने २२ प्रवाश्यांसाठी प्रत्येकी बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे नोकरदार प्रवाश्यांना दिलासा लाभला होता व जसे जसे प्रवासी वाढत आहे तसतशा बसेस वाढवण्यात येत असल्याची माहिती पिंपळगाव आजारातून मिळाली आहे

कोट...
पिंपळगाव आगराच्या वतीने बस सेवा सुरळीत करण्यात आल्या आहे जश्या पद्धतीने प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल तश्या पद्धतीने बसेस निर्जंतुकीकरण करून सोशल डिस्टिंगचे पालन करत प्रवाशांच्या सेवेत सज्ज करण्यात येत आहे
विजय निकम
पिंपळगाव आगार व्यवस्थापक

या बस फेऱ्या सद्या सुरू झाल्या 
सटाणा नाशिक, नंदुरबार,मालेगाव,निफाड, नांदगाव.
 

Web Title: Pimpalgaon depot's Lalpari service starts smoothly ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.