पिंपळगाव धाबळीच्या तरुणाचा धारदार हत्याराने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 11:54 PM2022-02-07T23:54:08+5:302022-02-07T23:57:43+5:30

मनमाड/चांदवड : लासलगाव-मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदवड पोलिसांनी व्यक्त केला आहे .

Pimpalgaon Dhabli youth murdered with a sharp weapon | पिंपळगाव धाबळीच्या तरुणाचा धारदार हत्याराने खून

अनिल आहिरे

googlenewsNext
ठळक मुद्देजनावरे खरेदी-विक्रीतून खून झाल्याचा संशय

मनमाड/चांदवड : लासलगाव-मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदवड पोलिसांनी व्यक्त केला आहे .

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केल्यानंतर जनावरांच्या अवैध खरेदी-विक्रीतून अनिल आहिरे ( ३२) रा. पिंपळगाव धाबळी याचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी (दि.६) अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रासोबत जात असल्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, रात्री तो परत आला नाही. अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिली. अनिल हा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा असेही त्याने पोलिसांना सांगितले .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळाली होती. घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे, चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पालवी , अनिल पवार, नरेंद्र सौंदाणे,उत्तम गोसावी, सलीम शेख, नरवटे,झाल्टे, खैरनार,चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून, लवकरच या खुनाचे धागेदोरे हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दारूच्या बाटल्याही आढळल्या
तरुणाच्या डोक्यावर , पोटावर, हातावर , धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी जवळच त्याची मोटारसायकल सापडली तसेच दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सदर मृतदेह अनिल आहिरे याचा असल्याचे निष्पन्न झाले. तो चांदवड तालुक्यातील पिंपळगाव (ढाबळी) येथील रहिवासी आहे.

Web Title: Pimpalgaon Dhabli youth murdered with a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.