पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे लवकरच सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:06 PM2018-10-02T18:06:26+5:302018-10-02T18:06:40+5:30

ग्रामसभेत माहिती : मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार

Pimpalgaon Gram Panchayat will soon start the service center | पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे लवकरच सेवा केंद्र

पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे लवकरच सेवा केंद्र

Next
ठळक मुद्देशहर परिसरातील कुष्ठरोग रु ग्ण शोधण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून गोवर रु बेला रोगांवर लवकरच शासनाकडून लस उपलब्ध करण्यात येणार आहे

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव ग्रामपालिकेची ग्रामसभा मंगळवारी (दि. २) पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात सरपंच अलका बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपालिकेच्या वतीने शहरात ४२ दाखले नाममात्र दरात मिळण्यासाठी सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार असून शहरात भटकणाऱ्या मोकाट जनावरांचाही बंदोबस्त केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सभेत ग्रामसेवक लिंगराज जंगम यांनी नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याची व स्वच्छता ठेवण्यासाठी शपथ दिली. याशिवाय ग्रामपालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने शहर परिसरातील कुष्ठरोग रु ग्ण शोधण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून गोवर रु बेला रोगांवर लवकरच शासनाकडून लस उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिले बाळंतपण असणा-या महिलेला शासनाकडून पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी चेतन काळे दिली. तलाठी तसेच कृषी अधिकारी यांनी आपापल्या विभागातील योजनांची माहिती सांगितली. गोरखनाथ गांगुर्डे यांनी ग्रामीण रु ग्णालयात असलेल्या औषधांच्या तुटवडयाकडे लक्ष वेधले. तसेच रु ग्णालयातील परिचारिका रु ग्णांशी असभ्यपणे वागत असल्याची तक्रार केली. गणेश शेवरे यांनी बेकायदेशीर दारू दुकाने बंद करण्याची मागणी केली. सिद्धार्थ पवार यांनी आंबेडकर नगर परिसरात शौचालयांची संख्या वाढविण्याची मागणी केली तर निफाड रोड परिसरातील नागरिकांनी मनाडी नाल्यावरील रस्त्याची कामे करण्याची मागणी केली. उपस्थित प्रश्नांना सदस्य गणेश बनकर यांनी उत्तरे दिली.
यावेळी उपसरपंच संजय मोरे, सदस्य अल्पेश पारख, किरण लभडे, सत्यभामा बनकर, सुरेश गायकवाड, विश्वास मोरे,दीपक विधाते, बाळा बनकर,राजेंद्र भवर,चेतन मोरे, प्रशांत घोडके, सुधीर बागुल,भाऊसाहेब खैरनार,शरद सोनवणे, दत्तात्रेय धाडीवाल, गोरखनाथ गांगुर्डे,अश्विन घागरे, मयुर गावडे, अजय चोरिडया आदी उपस्थित होते.

Web Title: Pimpalgaon Gram Panchayat will soon start the service center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.