पिंपळगाव हायस्कुलच्या एनसीसी कॅडेटने मिळविली सर्व शिबिरांमध्ये सुवर्ण पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:34 PM2019-10-13T17:34:25+5:302019-10-13T17:45:14+5:30
पिंपळगाव बसवंत : चालु शैक्षणिक वर्षातील मे ते सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यातील अंजनेरी त्रम्बकेश्वर, नाशिक येथे झालेल्या वार्षिक शिबिरांमध्ये पिंपळगाव हायस्कुलच्या एन. सी. सी. कॅडेटसने चमकदार कामगिरी केली असून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी विविध स्पर्धांमध्ये पिंपळगाव हायस्कुलचे नाव उज्ज्वल करत ड्रिल स्किल टेस्ट, टग आॅफ वार, व्हॉलीबॉल, सांस्कृतिक स्पर्धा यात प्राविण्य दाखवत प्रत्येक शिबिरात सुवर्ण पदके मिळविले आहे.

देशात साधारण दरवर्षी १५ लाख विद्यार्थी सहभागी होतात. त्यातून देशप्रेम निष्ठा आदर असलेली साहसी युवक तयार होतात. सेवन महाराष्ट्र बटालियनच्या प्रत्येक शिबिरांमध्ये २५ शाळांमधील व १६ महाविद्यालयातील ४०० कॅडेटस सहभागी होतात.
यावेळी बटालियनचे कमांडिंग आॅफीसर कर्नल उपेंद्र कुशवाह, कर्नल ए. के. सिंग, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब जाधव व सर्व पदाधिकारीसह संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकव्रुन्द आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्व विद्यार्थांना एन.सी.सी अधिकारी लेफ्टनन नितीन डोखळे यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय छात्र सेनेचे शिबिर हे दहा दिवसांचे निवासी असते. आपल्या घरापासून दुर सैन्य दलातील अधिकारी व जवानांसोबत निसर्गाच्या सानिध्यात ते राहतात व प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणात सकाळी लवकर उठणे, धावणे, योगा करणे या पासुन सुरवात होते.
दुपारच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने, फायरिंग, नकाशा वाचन, शस्त्र परिचय, संचलन, युध्दाच्या वेळी सैन्यात वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक खुणा, आपत्ती व्यवस्थापन या विविध गोष्टी शिकवल्या जातात. तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्र म व विविध खेळ घेतले जातात. या सर्वांच्या माध्यमातून कॅडेटची अनेक अंगभूत कौशल्य विकसित होण्यास मदत होते.
कॅडेटचा व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने तसेच बालवयातच त्यांच्या मनात देशभक्ती देशप्रेम शिस्त आणि ऐकता रु जावी या हेतूने एन.सी.सीच्या वतीने संपूर्ण देशात प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. एन.सी.सी ही भारतातील देशांतर्गत असुरक्षीत प्रसंगी नागरी संरक्षण व नागरीसेवेसाठी मोलाचे कार्य करणारी छात्र संघटना असून २६ नोव्हेंबर १९४३ ला विशेष कायदा मंजूर करून एन.सी.सी ची स्थापना करण्यात आली.