पिंपळगावी बाजारपेठा गजबजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:42+5:302021-06-09T04:18:42+5:30
राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नियमावलीत काही सुधारणा केली. जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ ...
राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नियमावलीत काही सुधारणा केली. जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव शहरात सोमवारी बाजारपेठेत नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. वाहनांनी रस्ते ब्लॉक झाले होते. किराणा व भाजीपाला मंडीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. (०८ पिंपळगाव २)
------------------------
कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळेच आपण कोरोनाला हद्दपार करू शकलो. आता नियम शिथिल झाले असतानादेखील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नेहमी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर चा वापर करावा जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
- गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्य
........................
नियम शिथिल झाले; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही ते नियम तसेच आहे. तरीदेखील नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून नागरिक, व्यापारी व दुकानदारांकडून नियमांना हरताळ फासली जाणार नाही.
-वैशाली पवार, सामाजिक कार्यकर्त्या
===Photopath===
080621\08nsk_19_08062021_13.jpg
===Caption===
०८ पिंपळगाव २