पिंपळगाव बाजारात टमाट्याला लाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:36 AM2019-08-08T00:36:35+5:302019-08-08T00:38:58+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला ४० रुपये किलो भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टमाटा हंगाम सुरू होतो, हंगामाच्या सुरुवातीलाच टमाट्याला ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला ४० रुपये किलो भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टमाटा हंगाम सुरू होतो, हंगामाच्या सुरुवातीलाच टमाट्याला ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे.
मागील वर्षी दहा ते पंधरा हजार कॅरेट टमाटा रोज बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत होता; मात्र यावर्षी गेल्या आठवड्यात सतत पाऊस पडत राहिल्याने टमाट्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी रोज सरासरी ७०० ते ८०० कॅरेट माल विक्र ीस येत असून, प्रत्येकी २० किलो कॅरेटला ८०० ते ९०० रुपये दर मिळत आहे.पावसामुळे नुकसानसध्या जरी टमाट्याला चांगला भाव मिळत असला तरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडावरील फुलकळी गळली गेली तसेच काढणीला आलेल्या मालाला तडे गेल्याने खराब झाला असून, आवक व पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे तेजी आली आहे.आमचे दोन एकर टमाटा पीक असून, जवळपास दोन लाख रुपये खर्च केला; मात्र पावसाचे प्रमाण खूप झाल्याने हातातोंडाशी आलेले टमाटे खराब झाले. आज जरी भाव चांगला असला तरी पण मालाचे खूप नुकसान झाल्याने जवळपास ७० टक्के मालाचे नुकसान झाले.
- अण्णासाहेब कुशारे, नांदुर खुर्द
आॅगस्ट महिन्यात मी रोज शंभर ते दीडशे कॅरेट माल विक्र ीसाठी आणत होतो. यावर्षी पावसाने नुकसान झाल्याने रोज वीस ते पंचवीस कॅरेट टमाटे विक्र ीस आणत आहे.
- संतू जाधव, चिंचोले, ता. चांदवड