पिंपळगावी अवैध वाळू साठ्यावर छापा; १५ लाखांचा दंड

By admin | Published: January 22, 2015 12:27 AM2015-01-22T00:27:58+5:302015-01-22T00:28:13+5:30

पिंपळगावी अवैध वाळू साठ्यावर छापा; १५ लाखांचा दंड

Pimpalgaon raid on illegal sand storage; 15 lakh penalty | पिंपळगावी अवैध वाळू साठ्यावर छापा; १५ लाखांचा दंड

पिंपळगावी अवैध वाळू साठ्यावर छापा; १५ लाखांचा दंड

Next

पिंपळगाव बसवंत : येथे अवैध वाळू साठ्यावर तहसीलदारांनी छापा टाकून १५ लाखांवर दंड केला आहे. पिंपळगाव येथील महामार्गावरील साई आनंद कोल्ड स्टोअरच्या मागील बाजूस अवैध १६० ब्रास वाळूचा साठा होता. निफाडचे तहसीलदार संदीप अहेर, मंडल अधिकारी शेख यांनी या साठ्याचा पंचनामा करून राजेंद्र ज्ञानदेव पाटील, सुयोग घुमरे यांच्यावर कार्यवाही करून १५ लाख १२ हजारांचा दंड करून वाळूचा साठा जप्त केला आहे. वाळूचे लिलाव सर्वत्र बंद असताना मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे पिंपळगावात असून, वाळू साठ्यावर ही पहिलीच मोठी कार्यवाही असून, या कार्यवाहीने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Pimpalgaon raid on illegal sand storage; 15 lakh penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.