पिंपळगाव सहा दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:40 PM2020-06-09T18:40:21+5:302020-06-09T18:40:28+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रु ग्ण आढळून आल्याने परिसर सील करण्यात आला असून त्यातच एका संशयिताचा मृत्यू होऊन त्याचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रु ग्ण आढळून आल्याने परिसर सील करण्यात आला असून त्यातच एका संशयिताचा मृत्यू होऊन त्याचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पिंपळगाव ग्रामपंचायत, प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठेतील अनेक दुकाने सकाळी ८ वाजता उघडू लागली. त्यामुळे नागरीक बाजारात खरेदीसाठी हजारोच्या संख्येने गर्दी करू लागले होते. शासनाने आखून दिलेले नियम व सूचना पायदळी तुडवत सर्वत्र फिजिकल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. परंतु शहरातील व्यापार भवन येथे ३४ वर्षीय तरु ण कोरोना बाधित सापडल्याने तो परिसर सील करण्यात आला. त्यातच परिसरातील माळीगल्ली येथील एक ५५ वर्षी चहावाला कोविड केंद्रात दाखल होऊन त्याचा मृत्यू होऊन त्याचाही अहवाल कोरोना संक्रमित आल्याने प्रशासन हादरले. सदर रुग्णाच्या संपर्कात मोठ्या संख्येने नागरिक आले असल्याचा संशय आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रु ग्णाच्या केवळ प्रतिबंधित क्षेत्रच सिल न करता, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील प्रसार रोखण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहर बुधवार (दि.९) पासून रविवार (दि. १४)पर्यंत बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, विश्वास मोरे, पोलीस निरीक्षक संजय महाजन ,म् ांडलाधिकारी निळकंठ उगले , तलाठी चंद्रकांत पंडित , ग्रामसेवक लिंगराज जंगम यांचेसह व्यापारी वर्ग उपस्थित होता.