पिंपळगाव टोल वसुली २३ पर्यंत स्थगित
By admin | Published: May 20, 2014 11:32 PM2014-05-20T23:32:26+5:302014-05-21T00:40:00+5:30
नाशिक : स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल वसुलीला २३ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
नाशिक : स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल वसुलीला २३ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
नाशिक शहरातील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने या उड्डाणपुलापोटी पिंपळगाव बसवंत येथील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीने घेतला आहे. त्यासाठी अगोदर १२ मेचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला; परंतु स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविल्याने आठ दिवस दरवाढीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा वृत्तपत्रातून जाहिरात देऊन मंगळवार, दि. २० मेपासून वाढीव टोलवसुली केली जाईल असे जाहीर केले; मात्र सोमवारी याची माहिती मिळताच, पिंपळगाव येथील नागरिक व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला. त्यावर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरा पिंपळगाव पोलीस ठाण्यात बैठकही घेण्यात आली; परंतु रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, ओझर येथे उड्डाणपूल उभारावा व काही ठिकाणी भूमिगत मार्ग करण्याची मागणी लावून धरल्याने या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपर्क साधला असता, येत्या २३ मे रोजी त्यांनी बैठक घेण्याचे निश्चित केल्याने आता या बैठकीनंतरच वाढीव टोल वसुलीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर यांनी सांगितले.