पिंपळगावकर एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 07:30 PM2020-08-16T19:30:00+5:302020-08-16T19:31:24+5:30
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्षात घेता पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवित यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.

पिंपळगाव बसवंत शहरात साजरा होणाºया आगामी बैल पोळा व गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधिक्षक अरु ंधती राणे, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक सुप्रिया आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, बापूसाहेब पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे, वीज वितरणचे उपअभियंता नितीन पगारे, किरण लभडे, नितीन बनकर, गफ्फार शेख, सत्यजित मोरे, दीपक मोरे, बाळासाहेब आंबेकर, संतोष गांगुर्डे, भाऊ घुमरे, गणेश कुशारे, मयूर गावडे आदी उपस्थित होते.
वालावलकर यांनी आगामी गणेशोत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांची सविस्तर माहिती देत पिंपळगाव शहरात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जनासाठी ठीक ठिकाणी कुत्रीम तलाव उभारण्याच्या सूचना ग्रामपालिकेस केल्या. तर सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात देखावे टाळून रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्र म राबविण्याचे आवाहन केले.
बैठकीत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याबाबत शहरातील ८० टक्के मंडळांनी पसंती दर्शविली तर अन्य मंडळांकडून आपल्या नेहमीच्या जागी साधेपणाने गणपती बसविणार असल्याचा सूर उमटला. बैठकीस पिंपळगाव पंचक्र ोशीतील सर्व मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.