पिंपळगावी उन्हाळ कांदा १३ हजार रूपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:03 PM2019-12-03T14:03:31+5:302019-12-03T14:03:42+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला.
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला. सोमवारी (दि. २) उन्हाळी कांद्याला ११,३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. कांद्याच्या उत्पादनात झालेली घट व लाल कांद्याचे झालेले मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे कांदा शंभरी पार करून गेला आहे. मागील वर्षी शेतकरीवर्गाने सहा ते सात महिने साठवून ठेवलेल्या कांद्याला गतवर्षी ८०० ते १३०० रुपये दर मिळत होता. अनेक आंदोलने केल्याने शासनाने दोनशे रु पये प्रतिक्विंटल अनुदान दिले होते. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी कांद्याचे कमी उत्पन्न तसेच नवीन लाल कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे कांद्याचे भाव अजूनही वाढणार असे चित्र आहे. जिल्हातून सध्या केवळ वीस ते पंचवीस हजार क्विंटल कांदा शेतकरीवर्ग विक्र ीसाठी आणत आहेत. भारतातील सामान्य ग्राहकाला सरासरी दहा लाख टन कांदा रोज लागत असून, उत्पन्न अल्प झाल्याने सरासरी दोन महिने नवीन पुन्हा लागवड केलेला लाल कांदा येईपर्यंत तेजी कायम राहाणार आहे.
मागील बाजारभावाचा विचार केला असता सन २०१३ साली कांदा ३० ते ४० रुपये किलो होता. २०१५ साली ३५ ते ४० रुपये दर मिळत होता. २०१७ साली ५५ ते ६० रुपये दर मिळत होता. परंतु हे दर फक्त आठ ते दहा दिवसच मिळाले. त्यानंतर दरात घसरणच होत गेली.