पिंपळे धरण धोकेदायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:48 PM2020-07-11T20:48:39+5:302020-07-12T02:03:03+5:30
खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
संबंधित विभागाने निरीक्षण करून माती नाला बांध व त्याची क्षमता तपासून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा धरण फुटल्यानंतर शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. धरणाची दुरुस्ती लवकर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पिंपळा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाल्यांना पूर येऊन धरण पूर्ण भरले आहे; मात्र धरणात पाणी मावत नसल्याने सांडव्यातून अतिरिक्त विसर्ग होण्यासाठी जागा नाही. यामुळे धरणाची पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. या धरण क्षेत्रात लगतच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे संबंधित विभागाची निरीक्षण करण्याची गरज आहे. सदर बांध हा तीस वर्षांपूर्वीचा आहे. नवीन दुरुस्ती अद्याप झालेली नाही. या धरणाकडे विशेष लक्ष न दिले गेल्याने त्याचे निरीक्षण न झाल्याने धरणाची क्षमता व त्याची आवक याचा अंदाज आजपर्यंत आला नाही. यामुळे दुरुस्ती करण्यासाठी दगडी पिचिंग नसल्याने बांधाला मोठे तडे गेले आहे.
सदर धरणाची दुरुस्ती लवकर केली तरच शेतकºयांची जमीन वाचणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर धरणाची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
------------------
शेतकºयांमध्ये भीती
सदर धरणाचा बांध मातीचा असल्याने धरणाचा बांध मोठा असला तरी कमकुवत होताना दिसत आहे. धरण लाभक्षेत्रात शंभरावर शेतकºयांची जमीन आहे. त्यात संपूर्ण शंभर टक्के जमीन पेरणी झाली आहे. पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली असली तरी बांध फुटण्याची भीती शेतकºयांमध्ये आहे.