पिसाळलेल्या कुत्र्यांचा जनावरांवर हल्ला पिळकोस : शेळ्या, पारडू, बोकड गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:10 AM2018-04-11T00:10:11+5:302018-04-11T00:10:11+5:30
पिळकोस : येथील आदिवासी वस्तीत व शिवारातील शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्यांना रविवारी (दि. ८) रात्री ३ वाजेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले.
पिळकोस : येथील आदिवासी वस्तीत व शिवारातील शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्यांना रविवारी (दि. ८) रात्री ३ वाजेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. एका रात्रीतून पाच शेतमजुरांच्या चार शेळ्या, पारडू, बोकड यांना चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. काही शेळ्यांना गंभीर इजा झाली असून, पिसाळलेल्या कुत्र्याचा गाव व परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी धसका घेतला असून, जखमी जनावरांवर नवी बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी व्ही.एस. अहेर यांनी उपचार केले. पिळकोस येथील आदिवासी वस्तीतील नंदू पवार, दीपक पवार, गणेश गांगुर्डे, देवीदास गांगुर्डे यांच्या शेळ्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले व त्यानंतर राकेश वाघ यांच्या पारडीला तोंडाला चावा घेत जखमी केले. पिळकोस व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने कुत्री पिसाळणे व त्यांनी जनावरांना व गावकºयांना इजा करणे, चावणे हे नित्याचेच झाले आहे. मागील दोन वर्षाच्या काळात पिळकोस परिसरात शिकारी कुत्र्यांच्या टोळीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. तेव्हा शेतकरी व आदिवासी बांधवांच्या शेकडो शेळ्या व बोकडांचा फडशा पाडला होता.