चिमुकल्यांनी अनुभवली पोलीस स्टेशनची सहल

By admin | Published: November 16, 2016 11:06 PM2016-11-16T23:06:04+5:302016-11-16T23:03:11+5:30

चिमुकल्यांनी अनुभवली पोलीस स्टेशनची सहल

Pimplona experienced a police station trip | चिमुकल्यांनी अनुभवली पोलीस स्टेशनची सहल

चिमुकल्यांनी अनुभवली पोलीस स्टेशनची सहल

Next

येवला : विद्या इंटरनेशनल स्कूलचे बालवाडी ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहल उपक्रमांतर्गत येथील शहर पोलीस स्टेशनला भेट दिली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बंदुकी, एस.एल.आर व त्यांचे प्रकार, कारागृह यासह पोलीसांच्या कामाबद्दल माहिती दिली. मुलांनी स्वताची काळजी कशी घ्यावी, व अडचणीच्या वेळी मदत कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलिसांच्या विशिष्ट गणवेशांबद्दल उपस्थित पोलीस कर्मचार्यानी विद्यार्थ्यांना माहिती दिली व गणवेशाचे महत्व समजावून सांगितले. पो. नि. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले. व मुलांनी सुद्धा त्यांना सहमती दर्शविली.
यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी शिंदे यांच्यासह विद्यालयातील शिक्षिका उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Pimplona experienced a police station trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.