पिंपरी चिंचवड संघ विजेता तर ठाणे संघाला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:44 PM2018-11-15T17:44:37+5:302018-11-15T17:45:02+5:30

देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देउन गौरविण्यात आले.

Pimpri Chinchwad winner and Thane team's runner-up | पिंपरी चिंचवड संघ विजेता तर ठाणे संघाला उपविजेतेपद

पिंपरी चिंचवड संघ विजेता तर ठाणे संघाला उपविजेतेपद

Next

देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देउन गौरविण्यात आले.
कर्मवीर आ. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल - बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धत रंगतदार व चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघावयास मिळाले. २५ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धत चंद्रपूर, नासिक ग्रामीण, वर्धा, पुणे, रायगड, ठाणे, लातूर, पिंपरी चिंचवड या आठ संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने ठाणे विरूद्ध चंद्रपूर व पिंपरी चिंचवड विरूद्ध लातूर ह्या संघात खेळला गेला. पिंपरी चिंचवड व ठाणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघावर मात करत विजेतेपद संपादन केले.
यावेळी बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असो. सचिव सुरेश बोंगाडे, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, नासिक ग्रामीण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी अहेर, अशोक अहेर, नगरसेवक प्रदिप अहेर, प्रा.स निश बच्छाव, सुनिल भामरे आदी यावेळी उपस्थित होते. विजेत्या पिंपरी चिंचवड संघाला चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धचे आयोजन नाशिक ग्रामीण बॉल बॅटमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नासिक ग्रामीण असो. सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितिन देवरे, इश्वर वाघ, सुनिल देवरे, प्रदिप अहेर, दिलीप गुंजाळ, सौगत दत्ता, मनिष हिंगोले,प्रा. नितिन गुंजाळ, आदिंसह नागरिक उपस्थित होते.
स्पर्धत नासिक ग्रामीण व लातूर यांच्यात झालेला उपउपांत्य फेरीचा सामना सर्वाधिक वेळ चालला. खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी पाहत तीन तास चाललेल्या हया सामन्यात लातूर संघाने बाजी मारली.सूत्रसंचालन ईश्वर वाघ यांनी केले. संभाजी अहेर यांनी आभार मानले.
 

 

Web Title: Pimpri Chinchwad winner and Thane team's runner-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक