पिंपरी सय्यदला परिवर्तनच्या प्रचाराचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:47+5:302021-01-08T04:44:47+5:30
पॅनलच्या वतीने तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. वॉर्ड क्र. १ मधून रोहन विजय पुलोखंडे, पूनम सुनील कदम, जयश्री ...
पॅनलच्या वतीने तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. वॉर्ड क्र. १ मधून रोहन विजय पुलोखंडे, पूनम सुनील कदम, जयश्री शशिकांत ढिकले; वॉर्ड क्र. २ मधून आत्माराम फकिरा वायकंडे, गणेश सदाशिव ढिकले, संगीता भास्कर पवार; वॉर्ड क्र. ३ मधून गणेश यशवंत कराटे, लता लखन वायकंडे; वॉर्ड क्र. ५ मधून राजेश नामदेव ढिकले, किरण सदाशिव ढिकले, संगीता रावसाहेब ढिकले; वॉर्ड क्र. ६ मधून राहुल शिवाजी ढिकले, संगीता आनंदा ढिकले, वत्सला अशोक ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली असून, पॅनलला नारळ, रोडरोलर, बस, ट्रॅक्टर ही चिन्हे देण्यात आली आहेत.
कोट-
ग्रामपंचायतीच्या कारभारात परिवर्तन आणण्यासाठी परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, मतदारांनी पॅनलला संधी दिल्यास निश्चितच दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- जगन्नाथ वाळु ढिकले, पॅनलचे नेते, माजी पोलीस पाटील.
चौकट -
असा आहे जाहीरनामा
भुयारी गटारीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वाया जाणारे पाणी वनीकरणासाठी व शेतीसाठी उपयोगात आणण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प राबविणे, गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, प्रधान मंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रत्येक कुटुंबाला शौचालय अनुदानाऐवजी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवून हागणदारीमुक्त गाव योजना राबविणे, वैयक्तिक प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवून वृक्ष लागवड करणे, गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर शाश्वत व कायमस्वरूपी प्रकल्प उभारणे, मत्स संवर्धन करून ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, गावतळ्याचे सुशोभीकरण करून बोट क्लबची सुविधा निर्माण करणे, क्रीडा संकुलातील अपूर्ण राहिलेली कामे व सुविधा पूर्ण करणे, सार्वजनिक वाचनालयात लोकनियुक्त संचालकांची नियुक्ती करून अद्ययावत अभ्यासिका निर्माण करणे, गावात आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व मोफत वायफाय इंटरनेटची सुविधा पुरविणे, ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची व योग्य त्या सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई/कार्यवाही करून ग्रामसभेचे कामकाज लोकाभिमुख करून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणणे.