जातेगाव येथे पिनाकेश्वर यात्रोत्सव
By Admin | Published: March 14, 2016 11:11 PM2016-03-14T23:11:57+5:302016-03-15T00:24:01+5:30
जातेगाव येथे पिनाकेश्वर यात्रोत्सव
नांदगाव : तालुक्यातील जातेगावपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पिनाकेश्वर मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जीर्णोेद्धाराच्या वर्धापननिमित्त हा यात्रोत्सव दरवर्षी भरविला जातो. यंदा ५१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील
शिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी सन १९६४ मध्ये हेमाडपंती पद्धतीचे बांधून परिसरातील नागरिकांच्या मदतीने जीर्णोद्धार केला. श्रीक्षेत्र काशी येथून देवीदेवतांच्या मूर्ती आणून चैत्र शु. नवमीस मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या तिथीस यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते.
मंदिराचे सभागृह, भंदारगृह व इतर बांधकामे ब्रह्मचारी श्री गंगागिरी महाराज यांनी पूर्ण केले. गेल्या सोमवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून ३० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी पिनाकेश्वराचे दर्शन घेतले असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित यावे, यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरूआहेत. यात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
कारच्या धडकेत युवक जखमी
सिडको : येथील सावतानगर भागात सायंकाळी एका कारने युवकास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.
मयूर पवार (१६, रा. शिवशक्ती चौक) हा रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने (एमएच १५/इ-७३०५) धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)