घटस्फोट न देणाºया पत्नींचे जिवंतपणीच पतींनी केले पिंडदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:37 AM2018-10-08T00:37:22+5:302018-10-08T00:39:39+5:30
नाशिक : पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा व परंपरा पूर्वापारपासून हिंदू धर्मात चालत आली आहे़ पिंडदान केल्याने मृत व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते, असा हिंदू धर्मात समज असल्याने वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू आहे़ मात्र, या परंपरेला फाटा देण्याचे काम मुंबईतील वास्तव फाउंडेशन या पत्नीपीडित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि़७) गंगाघाटावर केले़ पत्नीशी पटत नाही व पत्नी घटस्फोटही देत नाही यामुळे त्रस्त झालेल्या या पीडितांनी जिवंतपणीच आपल्या पत्नीचे श्राद्ध घालून पिंडदान केले़ मात्र, हा प्रकार रामकुंडावरील काही पुरोहितांच्या लक्षात येताच त्यांनी वास्तव फाउंडेशनचा हा प्रयत्न हाणून पाडल्याचे वृत्त आहे़
संदीप झिरवाळ ।

पती-पत्नी यांच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद निर्माण होतात व त्यांचे एकमेकांसोबत पटेनासे होते़ यातून वाद, भांडणे होऊन न्यायालयांमध्ये पोटगी, संपत्तीत वाटा अशा प्रकारचे दावे दाखल केले जातात़ त्यावर न्यायालय परिस्थितीनुरूप निर्णयही घेत असले तरी अखेरपर्यंत न्यायालय कौटुंबिक प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते़ न्यायालयात दाखल काही प्रकरणांमध्ये पतीला घटस्फोट हवा असतो, मात्र पत्नी घटस्फोट द्यायला तयार नसते व अनेक वर्षे न्यायालयात दावा सुरू असतो़ वास्तव फाउंडेशन ही पुरुषांच्या मानवी हक्कांसाठी लढणारी मुंबईतील संस्था असून, या संस्थेने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़
दरम्यान, गंगाघाटावर जिवंत पत्नीचे श्राद्ध घालत असल्याची माहिती काही पुरोहितांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जिवंत व्यक्तीचे श्राद्ध घालता येत नसल्याचे संबंधितांना सांगून पिंडदान सोहळ्याला विरोध केला होता़ घटस्फोटासाठी कालापव्ययहिंदू धर्मात घटस्फोटास मान्यता नाही. फारकत कायदेशीरपणे नाते संपुष्टात आणते, असाच विचार पुरुषांच्या मनात असतो पण धार्मिकरीत्या नाही. स्वेच्छेने लग्न न केल्याने वा लग्नानंतर जबाबदारी पेलू शकत नाही अशा विविध कारणांमुळे लग्न मोडतात. पुरुषांना हे मानायला कठीण जाते तर काही प्रकरणांमध्ये चूक नसताना त्यांच्यासह कुटुंबीयांना पोलीस चौकी, न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागतात़ कधी खोट्या आरोपाखाली पोलीस कोठडी किंवा तुरुंगातही जावे लागते. घटस्फोटासाठी कालापव्यय होतो व पतीला जीवन त्रिशंकूत अडकल्यासारखे वाटते म्हणूनच जिवंतपणी बायकांचे पिंडदान घालण्याचा सोहळा वास्तव संस्थेने पार पाडल्याचे सांगितले़