बाजार समितीच्या सभापतिपदी पिंगळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:07 AM2020-08-29T01:07:27+5:302020-08-29T01:08:00+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंगळे यांची निवड झाल्याने बाजार समितीत पिंगळे यांचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंगळे यांची निवड झाल्याने बाजार समितीत पिंगळे यांचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी सभापती संपत सकाळे यांच्याविरोधात एकवटलेल्या संचालकांनी सकाळे यांच्या विरोधात सचिव अरुण काळे यांच्याकडे पत्र देत सकाळे कृषी उत्पन्न बाजारसमिती ठरावाच्या विरोधात निर्णय घेत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी केली होती मात्र तत्पूर्वीच सकाळे यांनी रोटेशननुसार कार्यकाळ पूर्ण झाल्याचे सांगत राजीनामा देऊन राजकीय नाट्यावर पडदा टाकण्याचे काम केले होते. १७ संचालक असल्याने पिंगळे हे सभापती होणार हे स्पष्ट होते. शुक्रवारी बाजार समिती मुख्य कार्यालय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. थेटे यांनी अर्ज मागे घेतल्याने पिंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
न्यायालयात धाव घेणार
माजी सभापती देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असली तरी त्या निवडीला आव्हान देण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. न्यायालयात पिंगळे यांना बाजारसमिती कामकाजात हस्तक्षेप करू नये तसेच त्यांच्यावर लाच लुचपत खात्याने ठपका ठेवलेला असल्याने न्यायालयाने निर्बंध लादले आहे, असे चुंभळे यांनी सांगितले.