पिंगळे यांची कारागृहात रवानगी

By Admin | Published: January 18, 2017 12:58 AM2017-01-18T00:58:54+5:302017-01-18T00:59:07+5:30

पिंगळे यांची कारागृहात रवानगी

Pingale was sent to jail | पिंगळे यांची कारागृहात रवानगी

पिंगळे यांची कारागृहात रवानगी

googlenewsNext

नाशिक : छातीत दुखत असल्याच्या कारणावरून गत तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा वैद्यकीय तपासणीचे सर्व अहवाल सामान्य आले आहेत़ यामुळे रुग्णालय प्रशासनाने मंगळवारी (दि़ १७) सकाळी पिंगळे यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली़  बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार शनिवारी (दि़ १४) केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ इसीजी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल सामान्य आला, मात्र २४ तास निरीक्षणाखाली त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते़ सोमवारी दुपारी त्यांची दुसरी इसीजी तसेच टूडी इकोची तपासणी केली असता या दोन्ही तपासण्यांचे अहवाल सामान्य आले होते़ पिंगळे यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपणाला दोनवेळा चक्कर आल्याचे सांगितल्याने त्यांच्या मानेचा एक्स-रे काढण्यात आला़ त्याचाही अहवाल सामान्य आल्याने पिंगळे यांना कारागृहात पाठविण्यास हरकत नसल्याचा अहवाल देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Pingale was sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.