मानोरीत शेतातून पाईप, केबल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:23 PM2021-01-28T18:23:30+5:302021-01-28T18:24:05+5:30
मानोरी : मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील बाळासाहेब वावधाने यांच्या शेतातून मंगळवारी मध्यरात्री पीव्हीसी पाईप, कॉक, एल्बो आणि केबल चोरीस गेल्याची घटना घडली असून यात किमान सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वावधाने हे मंगळवारी मध्यरात्री (दि.२६) आपल्या शेतात कांद्याला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी मोटार चालू केली असता बराच वेळ होऊनही शेतात पाणी का येत नाही हे बघण्यासाठी ते गेले असता शेतात असलेले पाईपलाईनचे सर्व कॉकच कापून नेल्याचे आढळून आले. शिवाय कॉकजवळ ठेवलेले पीव्हीसी पाईप आणि केबल देखील चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.
दरम्यान, याच शेतातून याआधी एकदा विहिरीत असलेली इलेक्ट्रिक मोटार आणि केबल देखील चोरीस गेल्याची घटना घडली होती. दुसऱ्यांदा देखील विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता.
वावधाने यांनी आपली मोटार विहिरीत बांधून ठेवली असल्याने चोरट्यांना दुसऱ्यांदा मोटार चोरण्याचा प्रयत्न फसला. या परिसरात अशा चोरीच्या घटना घडत असल्याने हे चोरटे भुरटे असून परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त केला आहे.