टीव्हीवरची शाळा पाहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:08 PM2020-09-10T19:08:12+5:302020-09-10T19:10:19+5:30

इगतपुरी : कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली.

Pipeline of group development officers to watch the school on TV | टीव्हीवरची शाळा पाहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पायपीट

धामडकीवाडीची टिव्हीवरची आनंददायी शाळा उपक्र माची पाहणी करतांना किरण जाधव, भरत वेंदे, श्रीराम आहेर, निवृत्ती नाठे, प्रमोद परदेशी आदी.

Next
ठळक मुद्देधामडकीवाडी : भक्कम रस्ता करणार असल्याचा दिला शब्द

लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली. खाचखळगे आणि िदगड गोट्यांच्या रस्त्याने एक किलोमीटर पायपीट करून गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी धामडकीवाडी गाठली. बिनरस्त्याच्या अतिदुर्गम धामडकीवाडीसाठी लवकरच भक्कम रस्ता करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल नेटवर्क नसतांनाही येथील शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न यशस्वी केला. हा पथदर्शी प्रकल्प राज्यभरात अतिदुर्गम भागासाठी बहु उपयोगी असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाला सविस्तर कळवणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यभर शाळांमधील किलिबलाट थांबलेला आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडू लागल्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. आॅनलाईन शिक्षण द्यावे तर मोबाईलला नेटवर्कनाही. पेचात सापडलेले इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न सूक्ष्म नियोजनाने यशस्वी केला. राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय, शिक्षण तज्ञ, टिलिमिली आदींनी दखल घेऊन टीव्हीवरच्या शाळेची प्रशंसा केली. याबाबत इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, शिक्षक संघटनेचे नेते निवृत्ती नाठे यांच्यासह धामडकीवाडीला भेट दिली. रस्ता नसलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी येथे जाण्यासाठी अधिकाऱ्यांना एक किलोमीटर रस्ता तुडवावा लागला.
धामडकीवाडी गावात पोहोचल्यावर चावडीवर लावलेल्या टीव्ही समोर बसून चिमुरडे विद्यार्थी आनंददायी शिक्षणाचे धडे गिरवत असतांना दिसले. घरांमध्येही टीव्हीवर धामडकीवाडी पॅटर्न सुरू असल्याचे अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना अभ्यास क्र मावर आधारित प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. टीव्हीवर प्रसारण होणाºया यंत्रणेची माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी घेऊन प्रात्यिक्षक घेतले. टीव्हीवरच्या धामडकीवाडी पॅटर्नबाबत मुख्याध्यापक प्रमोद परदेशी, सहकारी शिक्षक दत्तू निसरड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगीवले, शिक्षणप्रेमी स्वयंसेवक बबन आगीवले, केबल तज्ञ अमजद पटेल यांनी अधिकाºयांना उपक्र माचे प्रभावी सादरीकरण केले.
 

Web Title: Pipeline of group development officers to watch the school on TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.