पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:50 AM2017-07-20T00:50:12+5:302017-07-20T00:50:31+5:30

पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Pirghal burglary gang-ravaged | पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंतसह परिसरात दुकाने, घरे, फोडून चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून, अनेक चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे . पिंपळगाव बसवंत येथील उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत राहणारा एक अल्पवयीन याच्यासह कल्पेश अंबादास देवरे (१९), राजेंद्र भास्कर मोरे (१८), महेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शाहरूख सलीम खाटीक आदींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदर चोरटे हे पोलिसांचे लोकेशन घेऊन मग चोरी करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. याकामी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत आठ चोरट्यांना पकडून मुद्देमाल जप्त केला असून, अनेक चोऱ्यांची कबुलीही चोरट्यांनी दिली. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल, चोरीसाठी वापरलेली पिक अप , मोबाईल, होमथिएटर, तसेच मोबाईल साहित्य असा ऐकुन साडेतीन लाख रु पये किमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला . या कामी पोलीस अधीक्षक संजय दराडे. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शन नाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे सह पो.नि.वासुदेव देसले, पो.उ.नि. कल्पेश दाभाडे, बिपीन शेवाळे यांसह शहरातील अत्यंत शिताफीने पाळत ठेवणारे पो.कॉ. मनोज बोराळे.तुषार झाल्टे. रविन्द्र चिणे, दुर्गेश बैरागी, रविन्द्र बाराहाते, शांताराम निंबेकर, हृषिकेश देवरे, निवृत्ती गिते, नंदु जाधव, चिंधू खांदे आदींनी याकामी कामगिरी बजावली.

Web Title: Pirghal burglary gang-ravaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.