मालेगावी यंत्रमाग कारखानदाराकडून पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:59 AM2018-12-14T01:59:12+5:302018-12-14T01:59:25+5:30
मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने मुशावरत चौक भागात छापा टाकून घातक पिस्तूल बाळगणाऱ्या यंत्रमाग कारखानदारास अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
मालेगाव : येथील विशेष पोलीस पथकाने मुशावरत चौक भागात छापा टाकून घातक पिस्तूल बाळगणाऱ्या यंत्रमाग कारखानदारास अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी सरदार बिल्डिंगसमोर सापळा रचून यंत्रमाग कारखानदार हिफजुल रहेमान मोहंमद इद्रीस (२४) रा.नयापुरा गल्ली नं. ११ यास ताब्यात घेत त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मॅग्झीन जप्त करण्यात आले. संशयिताकडे कोणताही शस्र परवाना मिळून आला नाही. विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हिफजुल रहेमान हा कारखानदार असून, स्वत:च्या कापडाच्या मील आहेत.
बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही संशयित गुन्हेगाराकडे अवैध शस्र असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.