खड्डा बुजवायला निघाले आणि पडले भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:02 AM2019-08-06T01:02:52+5:302019-08-06T01:03:20+5:30
मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकरोड : मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारी दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर असलेल्या भूमिगत नाल्याला सुमारे वर्षभरापूर्वी भगदाड पडल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजीबाजारात येणाऱ्या-जाणाºया सर्वांना काळजी घेऊन ये-जा करावी लागत आहे. नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्यासाठी विविध राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. त्यातील काही आंदोलन हे पुढे पाठपुरावा न केल्याने फोटोसेशनपर पुरतेच राहिल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाकडून दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावरील नाल्यावर पडलेले भगदाड दुरुस्त व बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याकरिता दुर्गा उद्यान शाहू पथ कोपºयापासून दुर्गादेवी मंदिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी मार्गाच्या रस्तादुभाजकपर्यंत नाला दुरुस्ती करण्यासाठी जेसीबीने मोठा खड्डा करण्यात आला आहे. मात्र पावसामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुरु स्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.