बिटको चौकातील खड्ड्याचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:09+5:302021-06-18T04:11:09+5:30
आहे. पवन हॉटेलकडून बिटको चौकातील शिवसेना कार्यालयाच्या दिशेने गॅस पाईपलाईनकरिता खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर मुरूम टाकून ...
आहे.
पवन हॉटेलकडून बिटको चौकातील शिवसेना कार्यालयाच्या दिशेने गॅस पाईपलाईनकरिता खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर मुरूम टाकून पाईपलाईनचा खड्डा बुजविण्यात आला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे व वाहनांच्या वर्दळीमुळे पाईपलाईनच्या खड्ड्यातील मुरूम बसून गेल्याने तिथे खोलगट भाग निर्माण झाला आहे. यामुळे वर्दळीच्या बिटको चौकातील सिग्नल सुटल्यानंतर खड्डयामुळे वाहनधारकांना वाहने धीम्या गतीने चालवावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
सिग्नल मिळावा म्हणून वाहनधारक घाई गडबड करत असल्याने अनेक वेळा वाद विवाद होतात. विनाकारण हॉर्न वाजविण्याची वेळ येते. बिटको चौकातील वर्दळ लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने चौकात पडलेले खड्डे तसेच गॅस पाईपलाईनकरिता शिवसेना कार्यालयापासून पवन हॉटेल व तेथून नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
Attachments area
===Photopath===
160621\500816nsk_48_16062021_13.jpg
===Caption===
बिटको चौकातील खड्डे