चांदोरी बसस्थानकात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:38 PM2019-11-08T18:38:52+5:302019-11-08T18:39:27+5:30
चांदोरी येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आगार बनल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, याची परिवहन मंडळाने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशी व गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.
चांदोरी : येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आगार बनल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, याची परिवहन मंडळाने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशी व गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.
निफाड तालुक्यातील गोदाकाठचे मध्यवर्ती गाव म्हणून समजले जाणारे चांदोरी येथील बसस्थानकाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. चांदोरी येथे बँक,
शाळा, महाविद्यालय व विविध सरकारी कामानिमित्त प्रवाशांची वर्दळ असते. तसेच गोदाकाठलगत असलेल्या गावकऱ्यांना नाशिक किंवा निफाड जायचे असेल तर त्यांना चांदोरी बसस्थानकवरून जावे लागते.
मात्र या स्थानकाच्या आवारात व प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे असल्याने प्रवाशांना उधळत जावे लागते, तर चालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. तसेच चांदोरी बसस्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय होते. जे स्वच्छतागृह आहे त्याची दुरवस्था झाली असून, तेथे अस्वच्छता असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.